✒️राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पवई आयआयटी मधून एक मन हेलावणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. आयआयटी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या आत्महत्या केली ही घटना समोर येताच सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पवई आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. दर्शन सोलंकी वय 18 वर्षे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दलीत समाजाच्या दर्शन हा मूळचा गुजरात राज्यातील अहमदाबादचा असून तो तीन महिन्यापूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत आला होता. 11 फेब्रुवारी रोजी त्याची परीक्षा झाली होती आणि 12 फेब्रुवारी त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थी दर्शन सोलंकी हा आयआयटीमध्ये बी. टेकच्या केमिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो आयआयटीतील 16 नंबर वसतिगृहाच्या 802 खोलीत राहत होता. रविवारी दुपारी अचानक वसतिगृहाच्या परिसरात काही तरी पडल्याचा आवाज आल्याने एकच धावपळ झाली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी बघितल्यावर दर्शन रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.
भारतीय शिक्षण क्षेत्रात जातिगत भेदभाव अनेकदा बघितला गेला आहे. जातीच्या नावाने अनेक दलीत, आदिवासी समाजाच्या विद्यार्थाचे आयुष्य बर्बाद करण्यात आले आहे. त्यामुळे दलीत विद्यार्थी दर्शन सोलंकीची आत्महत्या ही जातीगत हत्या तर नाही? या आत्महत्येवर अनेक प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आंबेडकर-पेरियार, फुले स्टडी सर्कल ने आपल्या दिलेल्या स्टेटमेंट मध्ये अनेक खळबळजनक आरोप केले आहे.
2014 मध्ये पण दलित विद्यार्थांने केली आत्महत्या.
IIT बॉम्बे मध्ये 2014 मध्ये अनिकेत अंभोरे नावाच्या 22 वर्षीय दलित दलीत विद्यार्थ्याने हॉस्टलच्या 6 व्या माळावरून उडी मारुन आत्महत्या केली होती. अनिकेत हा बीटेक च्या फॉर्थ वर्षाचा विद्यार्थी होता. त्याचा परिवाराने गंभीर आरोप केला होता की, IIT बॉम्बे मध्ये मुलाबरोबर जातिवाद झाला. त्यांचमुळे अनिकेत ने आपला जीव दिला. अनिकेत यांचा मृत्यू नंतर के A K सुरेश कमेटी बनवण्यात आली होती. कमेटी ने आपल्या रिपोर्ट मध्ये हे मानण्यात आले होते की, अनिकेत ला आरक्षणच्या कोट्यातून IIT बॉम्बे मध्ये प्रवेश मिळाल्यामुळे अनेक वेळा अपमानित (गिल्टी फ़ील) करण्यात येत होत. ये रिपोर्ट बनली, जांच झाली परंतु झाल काही नाही…
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348