पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पूणे :- भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांनुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, सचिन गाडे, निलेश ढमढेरे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना राजस सोसायटी चौक, कात्रज, पुणे येथे इसम नामे हाफिज रिजवान शेख, ऊर्फे सुलतान वय २१ वर्षे, रा. कोंढवा मिठानगर, खानेखास हॉटेलजवळील, रहमान बिल्डींग, पुणे हा त्याचे ताब्यात काळया रंगाचे बॅगमध्ये एक लॅपटॉप, व ४ मोबाइल फोनसह मिळुन आल्याने त्याचेकडे तपास त्याचे ताब्यातील लॅपटॉग भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरंनं ११४ / २०२३ भादंवि कलम ३७९ या गुन्हयामधील चोरीस गेला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे ताब्यातुन १ लॅपटॉप व 4 मोबाईल फोन असा एकुण १.३९,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक केली असुन त्याचे ताब्यातुन जप्त केलेले मोबाईल फोनबाबत तपास चालू आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा. श्री. विजयकुमार पळसुले मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीत पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, सचिन गाडे, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, अशिष गायकवाड, मंगेश पवार, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.