Monday, May 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वर्धा जिल्हात वाळू माफियांना राजकीय आश्रय की, महसूल विभागाचे अभय?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 15, 2023
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हात वाळू माफियांना राजकीय आश्रय की, महसूल विभागाचे अभय?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वेना नदीच्या खार्डी- बार्डी घाटातून काल पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त कारवाईत वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरल हसन यांचे मार्गदर्शनात प्रथमच वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली. शासनाला कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणाऱ्या वाळू माफियांना राजकीय आश्रय की महसूल विभागाचे अभय मिळत आहे. हा प्रश्न चर्चेत आलेला आहे.

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत महसूल आणि पोलीस विभागामार्फत छोट्या-मोठ्या वाळू तस्करांवर कारवाई केली जात होती. परंतु, अलीकडेच जिल्ह्याचा पोलीस अधीक्षकांचा पदभार नुरल हसन यांनी स्वीकारताच जिल्ह्यातील गुंड माफियांचे राज्य हळूहळू संपुष्टात येत आहे. याचाच प्रत्यय हिंगणघाट तालुक्यातील वाळू माफियांच्या माफियांवर काल झालेल्या कारवाई नंतर स्पष्ट झालेले आहे. काल जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार कांचन पांडे यांच्या नेतृत्वात अशी मोठी कारवाई करण्यात आली. काल झालेल्या कारवाईनंतर संशयित वाळू माफिया हा हिंगणघाट नव्हे तर विदर्भातील कार्यसम्राट म्हणून नावलौकिकास आलेल्या एका राजकीय नेत्याशी संबंधित उजवा हात असल्याचे बोलल्या जात आहे. या नेत्याच्या बळावर सदर वाळूमाफियाने महसूल विभागाला जणू गिळंकृत करून टाकले असावे, असाच सूर उमटत आहे. महसूल विभागाने गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेल्या सदर घाटावरील उत्खननावरून महसूल विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही, हे विशेष.

हिंगणघाट तालुक्यात मात्र, महसूल विभागाने कागदोपत्री कारवाई दाखवण्याकरिता इतर छोट्या रेती तस्करांना पकडून त्यांचेवर कारवाई केली असली तरी कारवाईत दुजाभाव बघता प्रसंगी महसुली विभागातील बड्या अधिकाऱ्यांना अपमान जनक परिस्थिती सहन करून प्रसंगी मार सुद्धा खावा लागला हे अलीकडील कारवाई दरम्यान दिसून आले.

गुंडांची कुमक आणि राजकीय आश्रयाचा फायदा घेऊन अनेक व्हाईट कॉलर वाल्यांनी तालुक्यात राजकीय फंडा वापरून शासनाला टोपी घातली. अलिशाण बंगले बांधले. राजकीय नेत्यांसोबत ऊठ-बैस करून त्यांच्यासोबत आलिशान गाडीतून ते फिरतात. या प्रकाराला शासन प्रशासनाची खाबुगिरी वृत्ती कारणीभूत नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे.
राजकीय वरदहस्त लाभलेल्या वाळू माफिया विरोधात कारवाई साठी महसूल विभागाने नांगी टाकली असली तरी पोलीस प्रशासनाने मात्र कंबर कसली आहे. पोलीस प्रशासनाच्या कारवाई वर राजकीयदृष्ट्या दबाव येत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

गेल्या चार महिन्यापासून वाळू माफियांना असलेले अभय बघता महसूल विभागाच्या पुढील कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट: अल खिदमत फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा सम्पन्न.

Next Post

हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने वेकोलि ग्रॅन्डसनचा प्रलंबित असलेला नोकरीचा मार्ग अखेर मोकळा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने वेकोलि ग्रॅन्डसनचा प्रलंबित असलेला नोकरीचा मार्ग अखेर मोकळा.

हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने वेकोलि ग्रॅन्डसनचा प्रलंबित असलेला नोकरीचा मार्ग अखेर मोकळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In