पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि. ११/०२ / २०२३ रोजी रात्री येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रगस्त दरम्यान पेट्रोलिंग करत असताना लक्ष्मीनगर चौकी हद्दीत गावठी हातभट्टीचे गाळप चालू असलेबाबत माहिती मिळाल्याने येरवडा पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांचे सह संयुक्तरित्या नाईकनगर येरवडा येथे कारवाईसाठी जावून येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम चक्रे, सपोनि प्रमोद खटके, पोउपनि विशाल पाटील यांनी पोलीस स्टाफसह व राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे निरीक्षक श्री. नंदकुमार जाधव व तानाजी शिंदे व स्टाफसह नाईकनगर येरवडा येथे चालू असलेल्या अवैध्य हातभट्टी गाळपाच्या दोन ठिकाणी अवैध्य चंदयावर छापा टाकून कारवाई केली..
सदर बाबत येरवडा पो.स्टे. येथे भादवि कलम ३२८ सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ) (ब)(क) (ड) कलमान्वये गुर नं ११७/२०२३ व गुर नं ११८ / २०२३ असे दोन गुन्हे दाखल केलेले आहेत. सदर कारवाईमध्ये ६ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ३२.१५०/- रू किंमतीचे ८०० लिटर कच्चे रसायन व साहित्य जप्त करुन नाश करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री शशीकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री किशोर जाधव वपोनि येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. बाळकृष्ण कदम, पोनि गुन्हे, येरवडा पोलीस स्टेशन श्री. उत्तम चक्रे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद खटके, पोउपनि विशाल पाटील पोलीस अंमलदार विनायक मुधोळकर, गोविंद जायभाय, संजय सकट, दयानंद कदम, विशाल मगदुम, अनिल मन्हाळकर, अर्जुन जाधव, अगर सोनवणे, अश्विन देठे, महिला पोलास अंमलदार भारती सुर्वे, शामलता देवकर व राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे निरीक्षक श्री नंदकुमार जाधव, निरीक्षक तानाजी शिंदे व स्टाफ सह केलेली आहे.