अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर-15 फेब्रुवारी 23:- येथून एक खळबजनक माहिती समोर आली आहे. तहसील कार्यालय सावनेर येथील कनिष्ठ लिपिकास लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने लाच रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडले. त्यामुळे संपूर्ण तहसील कार्यालय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलचुपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येऊन तक्रार नोंद केली होती. तक्रारदार व त्यांचे आई-वडील यांचे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत वाद झाल्याने तक्रारदार व त्यांच्या आई-वडिलांवर अदखलपात्र गुन्हा पोलीस स्टेशन खापा येथे दाखल झाला होता. तक्रारदार व त्यांचे आई-वडिलांवर कलम 107,116(3),151(1) सीआरपीसीनुसार प्रतिबंधक कारवाई तहसील कार्यालय सावनेर येथे होणार असल्याचे समन्स तक्रारदारास मिळाल्यावरून यातील आलोसे नामे अमोल चंद्रशेखर देशपांडे कनिष्ठ लिपिक तहसील कार्यालय सावनेर यांनी सदरची केस निकाली काढण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 4500 रुपयाची मागणी करून दि.15 फेब्रुवारी 2023 ला तडजोडी अंती 3000 रुपये लाच स्वीकारली.
नमूद आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाच्या दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाच रकमेची मागणी करून स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर जिल्हा नागपूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून उपरोक्त आलोसे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर कारवाई राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, मधुकर गीते आपण पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, पोलीस निरीक्षक श्रीमती प्रीती शेंडे, पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, नापोशी सारंग बालपांडे, मनापोशी गीता चौधरी, करुणा सहारे, अस्मिता मेश्राम, आशु श्रीरामे, दिपाली भगत, थानापोशी अमोल भक्ते यांनी केलेली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

