पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पुणे :- दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा , पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे
दरोडा ,वाहनचोरी ,जबरी चोरी, पाहिजे व तडीपार आरोपी यांचे वर प्रतिबंधक कारवाईचे अनुषंगाने हडपसर पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार अमोल सरतापे व संदीप येळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की साडे सतरा नळी सिरम कंपनीच्या मागील रोडवर हडपसर पुणे येथे दाढी वाढलेला एक इसम चोरीच्या ईनोवा गाडीसह थांबलेला आहे,अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी पथकाचे प्रमुख सुनिल पंधरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले असता त्यांनी सदर बाबत कारवाई करणे कामी योग्य त्या सूचना दिल्याने सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने सापळा रचून सदर संशयित इसमास अत्यंत शिताफीने पकडले व त्यास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव प्रदीप विष्णू यशवंत ,वय २४ वर्ष रा.के / ऑफ सुभाष जाधव यांच्या खोलीमध्ये भाड्याने, महादेव नगर हडपसर पुणे व मुळगाव देवळा ता. आंबेजोगाई ,जि. बीड असे सांगितले. त्यास सी.आर.पी.सी.41(ङ)प्रमाणे ताब्यात घेऊन दरोङा विरोधी पथकाचे कार्यालयात आणुन अधिक चौकशीत त्याचे ताब्यातील चारचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले व सदर चारचाकीबाबत हडपसर पो स्टे येथे गु र नं २५३/२०२३ भादवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्याने आणखी २ दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन जप्त आहे. आरोपीकडून खालील प्रमाणे एकूण २ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) हडपसर पो स्टे गु.र.नं.२५३/२०२३भादवि क.३७९ (चारचाकी)
२) पिंपरी पो स्टे गु.र.नं.५२/२०२३ भादविक.३७९ (दुचाकी)तसेच एका दुचाकीचा तपास चालू आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपीचा पूर्व इतिहास
१) भारती विद्यापीठ पोस्टे गुरनं ६२२/२०१६ भादवी क ३७९
२) भाडा पोस्टे गुरनं. १०९/२०१७, भादवी क ३९५, आर्म ऍक्ट ३/२५,४/२५
३)लोणीकंद पोस्टे गुरनं. ५८०/२०१७,आर्म ऍक्ट ३/२५,
४) कोंढवा पोस्टे गुरनं. २८२/२०१७,भादवी क ३९२,५०६,३४
५) रेणापूर पोस्टे गुरनं. २७३/२०१७,भादवी क ३९२,३४१,३४
६) चंदननगर पोस्टे गुरनं.१९१/२०१७ भादवी क ३९२,३४
७) हडपसर पोस्टे गुरनं.२५६/२०१७ भादवी क ३७९,
८) भोसरी पोस्टे गुरनं. ३७१/२०२२भादवी क ३७९,४११,३४
सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सो , मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस अंमलदार उदय काळभोर,दिनकर लोखंडे, अशोक आटोळे,अमोल सरतापे,संदीप येळे, विनायक येवले यांनी केली आहे*.