नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचे लाभ थेट लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमाअंतर्गत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते केंद्र सरकार व राज्य यांच्या विविध कल्याणकारी शासकीय योजनांचा भव्य लाभार्थी मेळावा कल्याण पूर्वेत पार पडला.
यासमयी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, आमदार किशोर दराडे, ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे, तसेच नगरसेविका हेमलता पावशे, नगरसेविका इंदिरा तरे, नगरसेवक नवीन गवळी, नगरसेवक निलेश शिंदे, नगरसेवक मल्लेश शेट्टी तसेच भारतीय जनता पार्टीचे व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.