स्वतःच्या रक्ताने लिहीलेले निवेदना द्वारे केली मागणी.
अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला: – रक्ताचे भाव वाढविण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या अशि मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निमा अरोरा मॅडम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत स्वतःच्या रक्ताने लिहीलेले निवेदनाद्वारे केली आहे.
जिवनावश्यक वस्तुंच्या महागाईच्या झळानी सामान्य जनता बेजार असतांनाच आता रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्ताच्या किंमती वाढविण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय गोर गरीब जनतेला तारक नसुन मारक आहे गोर गरीब रुग्णांना रक्तासाठी फिरावं लागतं त्यात ही तो रक्तगट उपलब्ध असला तरच मिळतो नाही तर त्यांची वाट पहावी लागते रक्ताचे वाढलेले शुल्क गोर गरीब रुग्णांना परवडणारे नाही नव्या दरा प्रमाणे गरिब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा भुर्दंड बसणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचे नविन दर लागु करण्यात आले आहेत. ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी व गोर गरीब रुग्णांना दिलासा द्यावा अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना राज्य प्रसिद्धी प्रमुख समीर खान, सामाजिक कार्यकर्ता ॲड रोशन तायडे, सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले, सईद भाई प्रामुख्याने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348