बेघर निवारा वृद्धाश्रम येथे वृद्धांना बेडशीट व अभ्यंकर प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना बुक-पेन्सिल वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवस हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंगणघाट शहरातील अभ्यकर प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना बुक व पेन्सिल वाटप करण्यात आले. तसेच बेघर निवारा वृद्धाश्रम येथे वृद्धांना बेडशिट वाटप करण्यात आले. यात बेघर निवारा वृद्धाश्रम येथील वृद्धांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्याचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. शहरात विविध उपक्रम राबवून वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अमोल बोरकर, सुनील भुते, जगदीश वांदिले, अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष बबलु शेख, नितीन भुते, गजू महाकाळकर, अनिल भुते, प्रवीण भुते, युवक जिल्हा महासचिव राजू मुडे, जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, सचिन पाराशर, तालुका उपाध्यक्ष पंकज भट्ट, गोलू भुते, तालुका संघटक आकाश बोरीकर, अंकुश दरोळी, निखिल ठाकरे, वैभव भुते, स्वप्निल पांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348