पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाइन पुणे : दि. १४/०२/२३ रोजी फैमिना स्पा, शिवशरण बिल्डींग, आशियाना पार्क को ऑप. सोसायटी, नार्थ मेनरोड, लेन नं ५ समोर, कोरेगाव पार्क, पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गि-हाईक पाठवून खात्री केली असता नमुद मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळून आल्याने तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०३ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यावेळी स्पाचे सदर दोन मॅनेजर यांना ताब्यात घेवुन व पाहिजे आरोपी स्पा चालक व स्पा जागा मालक असे चार इसमांविरुध्द कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गुरन २६ / २०२३ भादवि ३७०.३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३.४५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी स्पा मॅनेजर व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हें पुणे शहर श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सहा पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

