ध्वनी प्रदूषण थांबवा लायन्स क्लबची मागणी.
अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- फेब्रुवारी, मार्च मध्ये राज्य आणि सीबीएसई शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा असतात. सध्या या परीक्षा देणारे विद्यार्थी हे कोविड बॅच चे आहेत. आधीच यातील बहुतेक विद्यार्थ्यांना व्यवस्थित लिखाणाचा अर्थात अभ्यासाचा सराव नाही, निकालात मागे पडतील अशा चिंता अनेक पालक आणि शिक्षक व्यक्त करीत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता वातावरण निर्मिती करून देण्याच्या सामाजिक हेतूने स्थानिक लायन्स क्लब मार्फत सावनेर मध्ये ध्वनीप्रदूषनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले.
नेहमी करिता, प्रशासन असो वा जनता ध्वनी प्रदूषण बद्दल जागरूक राहून अस्तित्वात असलेल्या नियमांचे पालन केल्यास वयोवृद्ध, रुग्ण,विद्यार्थी यांना त्रास होणार नाही असे प्रतिपादन क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तसेच याद्वारे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही आणि जनतेने सुद्धा प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे असे नमूद केले. सार्वजनिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम जसे जयंती, पुण्यतिथी, उत्सव, मिरवणूक, मेळावे, सभा, लग्न समारंभ, धार्मिक विधी वगैरे साजरे करतांना आवाजाची तीव्रता आणि वेळेचे भान ठेवण्याची गरज आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाप्रमाणे अनावश्यक ध्वनी प्रदूषनाने सुद्धा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.
सावनेर शहरातील ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती पाऊले उचलल्या जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक मारुती मुळीक यांनी दिले. निवेदन सादर करते वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. शिवम पुण्यानी, सचिव प्रा.विलास डोईफोडे, माजी अध्यक्ष वत्सल बांगरे, पियुष झिंजूवाडिया, सुशांत घटे, डॉ. प्रवीण चव्हाण, ऍड. अभिषेक मुलमुले उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348