मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आलापल्ली, नागेपल्ली व अहेरी येथे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसा निमित्त आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष, भारत राष्ट्र समितीचे नेते, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उप जिल्हा रुग्णालय अहेरी, सेवा सदन रुग्णालय नागेपल्ली व आयुष्यमान भारत रुग्णालय आलापल्ली येथे रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले.
यावेळी आविस सल्लागार अशोकजी रापेल्लीवर, माजी सरपंच दिलीप गंजीवार, माजी सरपंच दिवाकर मडावी, माजी सरपंच विजय कुसनाके, ग्रा.प सदस्य फेलिक्स गिद्ध, ग्रा.प सदस्य आशिष पाटील, आविस सल्लागार विशाल रापेल्लीवर, सतीश आत्राम, उमेश आत्राम, मनान शेख,जुलेख शेख, विनोद कावेरी, संदीप बडगे, मिलिंद अलोने,जावेद अली, जयंत कांबळे, प्रमोद रामटेके, साईनाथ औतकार, मुस्ताक शेख, महेश गेडाम, परशुराम दहागावकर सह आविस व बि.आर.एस. चे पदाधिकारी उपस्थित होते.