नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- काल निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र संदेश न्युजला प्रतिक्रिया दिली.
निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारत आहोत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही सगळे मावळे आहोत. त्यांच्या विचारांशी प्रतारणा होत असेल तर ती आम्ही पहात राहू शकत नाही. शिवसेना आता योग्य मार्गावर वाटचाल करेल असे वचन आम्ही सर्व मावळे आज तमाम जनतेला देत आहोत. असे मुख्यमंत्री शिंदे बोलले.
ते पुढे म्हणाले की, धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळाले आहे. या रूपाने वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशिर्वाद आम्हाला मिळाला असल्याची आमची भावना असून ती प्रसादरूपाने आम्ही स्वीकारत आहोत.
शिवसैनिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या लढ्यात सामील व्हावे, त्यांना पूर्वीचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्याचे वचन मी आज देत आहे. पुढच्या काळात बाळासाहेबांच्याच विचारांवर वाटचाल केली जाईल आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठीच शिवसेना कार्यरत राहील. महाराष्ट्रातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348