पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर हददीत यातील फिर्यादी हे संतोषनगर परिसरात रिक्षामध्ये प्रवासी वाहतुकी करीता थांबले असताना, मोटर सायकलवर आलेल्या आरोपीतानी धारदार शस्त्राने फिर्यादी यांचेवर हल्ला केला होता. सदरबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरनं. ११९ / २०२३ भादवि. कलम ३०७,३२३,१४३,१४४,१४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५), महा. पो. अ. कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासा मध्ये फिर्यादी यांचेशी जुन्या वादाच्या कारणावरुन यातील आरोपीत यांनी हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हयातील आरोपी रेहान सिमा शेख उर्फ रेहान दिनेश शेख, वय- १९ वर्षे, रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे यास अटक करण्यात आली असुन गुन्हयातील सहभागी दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे व इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २, श्रीमती. स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, अति प्रभार स्वारगेट विभाग, पुणे श्री. सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय पुराणिक, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, अभिजीत जाघव, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, सचिन गाडे, अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले, निलेश ढमढेरे, अभिनय चौधरी, शैलेश साठे, चेतन गोरे, अशिष गायकवाड, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, राहुल तांबे व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.