पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
महाराष्ट्र संदेश न्यूज:- : महादेवांचा जयघोष करीत परिसरातील शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसरांना यात्रेचे स्वरूप आले होते.
कोंढवा खुर्द ग्रामस्थांचे संकटहरण श्रीमहादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहाटेपासून मंदिरामध्ये विविध पूजा व होमहवन, रुद्राभिषेक, शिववंदना, पांडुरंग सेवा भजन मंडळाचे भजन, महिलांचे भजन व विविध धार्मिक
कार्यक्रमांसह खिचडीचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रशांत लोणकर, त्रिशुलनाथ महाराज, दत्त लोणकर, अशोक लोणकर, मनोज झेंडे, राजू मिरपुरी, प्रशांत लोणकर, संजय लोणकर, राजेंद्र लोणकर, प्रसाद बाबर, गणेश लोणकर, अजित लोणकर, संतोष गोरड, संपत लोणकर, लक्ष्मण लोणकर आदींनी या उत्सवाचे नियोजन केले.

