पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
अमली पदार्थ विरोध पथक २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक: १९/०२/२०२३रोजी पोलीस नाईक साहिल शेख व पो शि अझीम शेख * यांना त्यांचे बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की * एक पुरुष बाणेर हायवे जवळ चतू:र्शृंगी पो स्टे हद्दीत एम डी विक्री करिता येणार असले बाबत माहिती मिळाली.सदर माहिती नुसार तात्काळ सापळा रचून छापा टाकला असता इसम नामे असिफ अलि अलिमुद्दिन शेख वय ३६ राह.हलावपुल,कुर्ला वेस्ट, मुंबई यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचे कडे २०ग्रॅम एम डी (mafedron)हा की.रू. ४,००,०००/-चा अमली पदार्थ,७०,०००/-₹ चे तीन मोबाईल,३,००,०००/-₹ की.ची स्विफ्ट कार, १४,०००/-₹ रोख असा एकूण ७,८४,०००/-₹ चा मुद्देमाल विक्रीकरिता आणलेला मिळून आला आहे.म्हणून त्याचे विरुद्ध गुन्हा NDPS act क .८(क),२२(ब)* अन्वये चतू:र्शृंगी पो स्टे ला गुन्हा दाखल केला असून आधिक तपास करीत आहोत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त सो. रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे सो. पोलीस उपायुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे सो.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ ,नारायण शिरगावकर सो. गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोध पथक 02 वपोनि. सुनील थोपटे यांचे मार्गदर्शनाखाली पो हवा संतोष देशपांडे, साहिल शेख, अझीमशेख,योगेश मांढरे, संदीप जाधव,मपोशी दिशा खेवलकर या पथकाने केली आहे