पंकेश जाधव, पुणे ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत 18 डिसेंबर 2018 ला एका पोलिस कर्मचाऱ्याला अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्या प्रकरणी आरोपीची निर्दोष सुटका, झाली आहे. हा महत्वपूर्ण निकाल पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला.
प्राप्त माहितीनुसार 23 डिसेंबर 2018 रोजी पोलिस कर्मचाऱ्याला अश्लिल शिव्या शिवीगाळ करत कॉलर धरून मारहाण केल्याची घटना सांगवी पोलिस स्टेशन या हद्दीत घडली होती. ही घटना समोर येताच शहरात एकच खळबळ माजली होती. या घटनेमधील संशयित व्यक्ती आरोपी म्हणून साहेब गौडा पाटील यावर सांगवी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून भारतीय दंड विधान कलम 353, 333, 504 सह विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी सांगवी पोलिसानी गुन्हा दाखल करून या प्रकरणी तपास करून पोलिसांनी हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट केले होते. हे प्रकरण पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे अनेक जणांची साक्ष, कागदपत्रे व मुद्देमाल तपासण्यात आले होते. मात्र सबळ पुरव्यामुळे या प्रकरणी सदर संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणात संशयित आरोपी तर्फे वकील ॲड. अरविंद धकाते, ॲड. शुभम लोखंडे, ॲड. राकेश धकाते, ॲड. रोहित देडगे, ॲड. शैलेश बेरे पाटील यांनी युक्तिवाद केला. यांच्या युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला व संशयित आरोपीस निर्दोष मुक्तता केली.