पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर..
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो श्री रितेशकुमार यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरी, जबरी चोरी, दरोडा सारख्या गुन्ह्यांना आळा घालून घडत असलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले.
दिनांक २०/०२/२०२३ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार हे हडपसर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त करीत असताना, पोलीस शिपाई ८७६७ विक्रांत सासवडकर व पोलीस शिपाई ८७९१ राहुल इंगळे यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे त्यांनी इसम नामे १) सत्यग नागदेव काळे, वय २५ वर्षे, रा. पुनावाला डेअरी फार्म सगोर, गोडबोले वस्ती, गुंढवा, पुणे मुळगांव मु.पो. पांघरी खुर्द, ता. मंठा जि. जालना २) स्वागत आप्पा मांढरे, वय १९ वर्षे, रा. के / ऑफ अक्षय वाडेकर, वाडेकर मळा, लोणकर वस्ती. केशवनगर, मुंढवा, पुणे मुळगांव अबिडकर नगर, शिवलिला हाईट्स शेजारी बारामती रेल्वे स्टेशन जवळ, बारामती, जि. पुणे यांना ताब्यात घेवून, त्यांचेवर सी.आर.पी.सी. कलम ४१ (१) (ड) प्रमाणे कारवाई करून, त्यांचकडुन ९ दुचाकी वाहने व ०३ मोबाईल फोन असा एकूण २,५२,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
१) हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ३१५/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे २) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १२११ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
३) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १४५०/ २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
४) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३१२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
५) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३०९ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
७) चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ८१ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे ८) चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ८३/२०२३ मा.व.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे ९) लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ६७४ /२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे १०) लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ६५४ / २०२२ भा.द.वि. कलम ३७५ प्रमाणे (११) बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ६४ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे १२) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
वरीलप्रमाणे जबरी चोरीचे गुन्ह्यातील ३ मोबाईल फोन व वाहनचोरीच्या गुन्ह्यातील ९ दुचाकी वाहने असा एकुण २,५२,०००/- रुपयांचा मुद्देमाल अटक आरोपी यांचेकडुन जप्त करुन वरील प्रमाणे ३ जबरी चोरीचे गुन्हे व ९ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाडवी, पोलीस उप निरीक्षक श्री. गुंगा जगताप व पोलीस अंमलदार, उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, अमोल सरतापे, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.