देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील हिंगणा तालुक्यातील विवीध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने हजारो लाभार्थ्यांना याचा फटका बसला आहे.
हिंगणा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या तालुका कार्यालयावर संपाच्या माध्यमातून नारे, निदर्शने व धरणे आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या त्या अशा किमान वेतन लागू करा, किंवा मानधन वाढवून देण्यात यावे,विमा योजनेचा लाभ द्यावा, पेंशन ची ताबडतोब तरतूद करावी इत्यादी मागण्या घेऊन अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा संप मागे घेतला जाणार नाही असंही संपकरी यांचे म्हणणे आहे. तालुक्यातुन संपूर्ण अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपात हजेरी लावली होती.आयटकचे काॅम्रेड शाम काळे यांनी संपकऱ्यांना मार्गदर्शन केले. नागपूर जिल्ह्यातून ६ हजार अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत तर राज्यभरातील २ लाख आठ हजार अंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्याने लाखो लाभार्थ्यांना याचा फटका बसला आहे.यावेळी करुणा साखरे,लालन मेश्राम,पंचशीला रामटेके, अर्चना रुसेसरी व करुणा ठाकरे इत्यादी सह मोठ्या प्रमाणात अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

