Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

थेट चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे पोलीस महासंचालक यांना दिले आदेश, जिल्हा प्रशासनात एकच खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 23, 2023
in चंद्रपूर, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
थेट चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे पोलीस महासंचालक यांना दिले आदेश, जिल्हा प्रशासनात एकच खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासनात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हाचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने हे आदेश दिले आहेत. थेट जिल्हाधिकारी यांनाच अटक करण्याचे आदेश आयोगाने दिल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.

चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना 16 फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आयोगापुढे जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाहीत, त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन 2 मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर 36 वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा आरोप या पीडित आदिवासींचा आहे आणि या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र आयोगाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाला चुनखडीच्या उत्खननासाठी 1979 साली सरकारने जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील 642 हेक्टर जमीन अटी व शर्तींसह हस्तांतरित केली. मात्र 24 आदिवासी कुटुंबांकडे मालकी असलेल्या 63.6 हेक्टर जमीनीवर माणिकगड सिमेंट कंपनीने जबरदस्तीने अवैध उत्खनन केल्याचा पीडित आदिवासींचा आरोप आहे. याविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून या आदिवासींनी मोर्चे-आंदोलनं करून आपला विरोध सुरु ठेवलाय. त्यासाठी आदिवासींवर अनेक गुन्हे देखील दाखल झाले.

2013 साली जिवती तालुक्यात तलाठी असलेल्या विनोद खोब्रागडे यांनी माणिकगड सिमेंट कंपनीकडून सुरु असलेल्या अवैध उत्खननाची चौकशी केली आणि अवैध उत्खनन केल्या प्रकरणी माणिकगड सिमेंट कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असा अहवाल दिला. मात्र हा अहवाल दिल्यावर खोब्रागडे यांची तातडीने बदली करण्यात आली. त्यानंतर 16 मे 2018 साली जिवतीचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी देखील माणिकगड सिमेंट कंपनीच्या अवैध उत्खननावर एक अहवाल सरकारला सादर केला. बेडसे यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बेडसे यांच्या अहवालात ज्या प्रमुख बाबी मांडण्यात आल्या त्या अशा प्रकारे आहेत

कंपनीकडून सुरु असलेलं चुनखडीचे उत्खनन हे अवैध आहे.
कंपनीची भूसंपादन कारवाई बेकायदेशीर व चुकीची आहे.
या उत्खननामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत आहे.
कंपनीकडून दिशाभूल करणारी कागदपत्रं सादर करण्यात आली आहे.
34 वर्षांपासून सरकारच्या महसूलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे उत्खनन करून कंपनीने आदिवासींवर अन्याय केला आहे.

मात्र तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या या अहवालावर कुठलीच कारवाई झाली नाही. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2021 ला माणिकगड कंपनी अल्ट्राटेक कंपनीच्या ताब्यात आली आणि कंपनीने वादग्रस्त असलेली 63.6 हेक्टर जमीन आपल्या नावे करण्यात यावी यासाठी अर्ज केला. त्यानुसार 2 मार्च 2021 ला या जमिनीचा फेरफार कंपनीच्या नावे करण्यात आला. मात्र तलाठी विनोद खोब्रागडे यांनी या विरोधात राजुरा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केली आणि उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी हा फेरफार खारीज केला. त्यानंतर कंपनीने या प्रकरणी चंद्रपूरच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात 20 जानेवारी 2022 ला राजुरा उपविभागीय अधिकारी यांचा आदेश कायम ठेवला तर 6 एप्रिल 2022 ला या आदेशाला स्थगिती दिली. या विरोधात स्थानिक आदिवासींनी नागपूर विभागीय आयुक्तांकडे अपील केलं आणि नागपूर विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी कंपनीच्या बाजूने देण्यात आलेल्या चंद्रपूर अपर जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे आणि यावर आता ते सुनावणी करून निर्णय देणार आहे. त्यामुळे आपल्या अधिकारांसाठी लोकतांत्रिक पध्दतीने लढा देणाऱ्या कुसुंबीच्या 24 आदिवासी कुटुंबांची लढाई आता अतिशय निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

महीलांशी मोबाईल फोनवर संपर्क साधून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन व फसवणूक करणाऱ्या आरोपींचा दिल्ली येथे शोध घेउन अटक शिवाजीनगर पोलीस ठाणेच्या पो.उ.नि मनीषा जाधव व पोलीस पथक यांची दिल्ली येथे कारवाई

Next Post

आंबेडकर जयंती आणि गुढीपाडवा निमित्त शिधापत्रिकेवर 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा मंत्रिमंडळाचा निर्णय.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आंबेडकर जयंती आणि गुढीपाडवा निमित्त शिधापत्रिकेवर 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा मंत्रिमंडळाचा निर्णय.

आंबेडकर जयंती आणि गुढीपाडवा निमित्त शिधापत्रिकेवर 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा मंत्रिमंडळाचा निर्णय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In