पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
युनिट – १ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ३०/०१/२०२३ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, येरवडा, पुणे येथुन विवीच गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेतलेले एकुण ०८ विधिसंघर्षीत बालके संरक्षण भिंतीला शिडी लावून कायदेशीर रखवालीमधून पळून गेले होते. त्यासंदर्भात येरवडा पोलीस ठाणे, पुणे येथे गुन्हा रजि.नं.८८/२०२३ भादवि कलम ३६३.२२४- अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पलायण केलेल्या विधिराधर्षीत बालकांचा शोध घेवून त्यांना
ताब्यात घेणेबाबत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी आदेशीत केले होते. विधान सभा कसबापेठ पोट निवडणुक प्रक्रीयेच्या अनुषंगाने कोणताही अनुचीत प्रकार होवू नये यासाठी विविध गुन्ह्यातील पाहीजे / फरार आरोपी यांचे तपासकामी तसेच गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलींग करीत असताना बाल सुधारगृहातुन पसार झालेल्या विधिसंघर्षीत बालकांपैकी एक विधिसंघर्षीत बालक, रा. लोणावळा, जि. पुणे हा महाराष्ट्रातुन परराज्यात पळुन जाण्याचे तयारीत असून तो पुणे स्टेशन येथे येणार असल्याची बातमी युनिट-१ चे पोलीस अंमलदार, निलेश साबळे यांना प्राप्त झाली.
सदर बातमीचे अनुशंगाने पुणे स्टेशन येथे युनिट-१ चे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन दिनांक २१/०२/२०२३ रोजी ताब्यात घेवून, त्याचेकडे चौकशी केली असता त्याने लोनावळा पोलीस स्टेशनचे हद्दीत त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून धारधार हत्याराने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता अशी हकिगत सांगीतल्याने त्याबाबत अधिक खात्री करता सदरबाबत लोणावळा पोलीस स्टेशन येथे गुरनं. ०२/२०२३ भादवि कलम ३०७ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात त्यारा बाल सुधारगृहात ठेवण्यात आले होते. तेथुन तो साथीदाराचे मदतीने पळून गेला होता.आहे.सदर विधिसंधर्षीत बालकास पुढील पुर्ततेकामी येरवडा पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे शहर, श्री. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संदीप भोसले, सहा. पो. निरी अशिष कवठेकर, पोलीस अंमलदार, निलेश साबळे, शशिकांत नरूटे, शुभम देसाई, विठ्ठल साळुंखे यांचे पथकाने केली आहे.