✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- राष्ट्रसंत प्रबोधनकार गाडगेबाबा यांची 147 वी जयंती ‘कही हम भूल ना जाये’ अंतर्गत बहुजन समाज पार्टीच्या वतीने नागपुरातील मेडिकल चौक शेजारी असलेल्या संत गाडगे बाबा धर्मशाळेतील गाडगे बाबांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करुन साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश बसपा चे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, पृथ्वीराज शेंडे, राजीव भांगे, नितीन शिंगाडे, विजयकुमार डहाट, मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे, उत्तर प्रदेशातील माजी सांस्कृतिक मंत्री यशवंत निकोसे, नागपूर जिल्हा प्रभारी नरेश वासनिक, राहुल सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, शहर प्रभारी विकास नारायणे, शहर उपाध्यक्ष सुमंत गणवीर, महिला नेत्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे आदींच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, माजी नगरसेवक मंगला लांजेवार, अजय डांगे, प्रवीण पाटील, सनी मून, योगेश लांजेवार, सदानंद जामगडे, ऍड अतुल पाटील, चंद्रशेखर कांबळे, शंकर थुल, प्रकाश फुले, नितीन वंजारी, बुद्धम राऊत, भानुदासजी ढोरे, सुनील सोनटक्के, एन आर उके, विलास मून, राकेश शेंडे, शामराव तिरपुडे, अरुण साखरकर, अनिल मेश्राम, आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

