सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात सुरू असलेले दारूचे अड्डे शहरातील तरुणांना दारूच्या आहारी बंनवून व्यसनाधिन बनवत आहे. बल्लारपूर शहरात दारूचे अड्डे हे शहरातील शांती भंग करत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अपराध वाढले आहे. तरुणाचे जीवन बर्बाद होत आहे. बल्लारपूर येथील तरुण जिवघेण्या दारूचे आदी होत असल्याचे चित्र संपूर्ण शहरात दिसून येत आहे. ती दारू चौभोवताल अगदी सहज उपलब्ध होत आहे. या दारूमुळे अनेक महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसल्या गेले आहे. अनेक परिवार उघड्यावर आले आहे. त्यामुळे बल्लारपूर शहरातील महिलांनी दारु ची दुकाने बंद करा या विरोधात मोठ्या प्रमाणात एल्गार पुकारला आहे. दिनांक १५ फेब्रुवारी ला चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना दारु बंदी साठी निवेदन दिले आहे.
आम्ही राणी लक्ष्मी वार्ड, किला वार्ड, गांधी वार्ड आणि या परिसरातील वस्ती विभागाचे आजू बाजू भागातील ५० वर्षा पासून राहणारे लोक आहोत. या परिसरातील श्री टोकिज आणि उज्जवला बार, आर. के. बार व सागर बीयर शोपी आहे. तसेच १०० मीटर च्या आत तहसील कोर्ट, देवस्तान, जनता विद्यालय सिटी ब्रांच, जेव्हेरी गर्ल्स शाळा आहे. या रस्तावर शाळेची मुले व मुली येणे जाने करतात.

माधुरी रेड्डी यांचा घरी लहान मुला व मुली ची शिकवणी वर्ग घ्येतात. त्यांच्या बाजूला सागर बीयर शोपी आहे. त्याच्या सुधा त्यांना जास्त त्रास आहे. आणि तो एकच मुख्य रस्ता आहे वस्ती जाण्या येण्यासाठी शैक्षणीक संस्था जव्हेरी कन्या विद्यालय बल्लारपूर, जनता विद्यालय, सिटी ब्रांच बल्लारपूर, तसेच दिवानी व फौजदारी न्यायालय, स्त्रिया व पुरुष लहान मुला व मुली ना त्रास होत आहेत.
या सदर ठिकानी देशी दारूचे दुकान दिल्यास येथील शाळकरी मुला व मुली अनाहत त्रास होण्याची शक्यता आहे. दारू व्यवसायामुळे लोक दारू पियुन येथे अनुचित प्रकार घडू शकते त्या मुळे सदर परिसरात कोणतेही देशी दारूचे किंवा कोणत्याही मद्य व्यवसाया करिता परवाना देण्यात येऊ नये. जर येते देसी दारूची दुकान दिल्यास कायदा व सुव्यस्त भंग होण्याची शक्यता जास्त आहे. आताच दोन बार व एक बीयर शोपी आहे. झगडे होत असतात त्याच पण आम्हाला जास्त त्रास होतात आहे. जेणे करून आम्हच्या निवेदनावर कारवाई करण्यात यावी. असे निवेदन सबंधित सर्व विभागाला तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही महिलांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिला आहे. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास महिला याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. समस्त राणी लक्ष्मी वार्ड, किल्ला वार्ड, गांधी वार्ड व या परिसरातील रहिवाशी बल्लारपूर. असे या निवेदनातून या महिलांनी म्हटलें आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

