प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज : ऑनलाईन नागभीड:- काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे निर्माण झालेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राबविले जात आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसकडून रणनिती आखली जात असून प्रदेश पातळीवरून प्रत्येक जिल्ह्यातील गावात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याच अनुसंघाने नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी यांचे अध्यक्षतेखाली तसेच चिमुर विधानसभेचे समन्वयक डॉ. सतिश वारजूकर यांचे मार्गदर्शनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विचार तळागळात पोहचविण्यासाठी तसेच केंद्रातील मोदी सरकार यांचे अपयश लोकापर्यंत पोहचविण्यासाठी हात से हात से जोडो अभियान पारडी ठवरे येथे घेण्यात आला.
यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, मा.पं.स.सभापती प्रणयाताई गड्डमवार, नागभीड समन्वयक हरिषजी मुळे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे, नागभीड शहर यूवक अध्यक्ष महेश कुर्झेकर, सुधाकरजी पेंदाम, गोपालजी म्हस्के, गावातील मंडळी उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348