Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नातेवाईकांसाठीही जेवणाची विनामूल्य सोय; ठाणे मनपा, अक्षय चैतन्य संस्था व रिलायन्स फाऊंडेशनचा उपक्रम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 24, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नातेवाईकांसाठीही जेवणाची विनामूल्य सोय; ठाणे मनपा, अक्षय चैतन्य संस्था व रिलायन्स फाऊंडेशनचा उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाच्या सेवेसाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांसाठी जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने अक्षय चैतन्य संस्था आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या साथीने हा उपक्रम नुकताच सुरू केला आहे. सुरुवातीला दुपारी १२ ते २ या काळात ही सुविधा उपलब्ध असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन सायं. ७ ते ९ या काळातही भोजनाची सोय करण्याचा विचार असल्याचे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. सध्या सरासरी १५० ते २०० नातेवाईक या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठिकठिकाणचे रुग्ण येतात. प्रत्येकापाशी पुरेसे मनुष्यबळ नसते. त्यामुळे सोबतीला असलेल्या नातेवाईकावर चांगलाच ताण येतो. अशात त्याला जेवणाची चिंता अधिक त्रासदायक ठरते. त्यातून मार्ग काढण्यासाठी अक्षय चैतन्य संस्थे पुढाकार घेतला. भायखळा येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहात जेवण तयार केले जाते. मग मोठ्या डब्यातून ते संबंधित ठिकाणी पोहोचवले जाते. महापालिकेने त्यांना हॉस्पिटलच्या परिसरातीस रात्र निवारा इमारतीत तळमजल्यावर जेवण वाढण्यासाठी जागा दिली आहे. त्यात भात, डाळ, भाजी असे नेहमीचे जेवण असते. सुटीच्या किंवा सणाच्या दिवशी गोड पदार्थाचाही जेवणात समावेश केला जातो. अन्नाची नासाडी होऊ नये, ते वाया जाऊ नये, या साठी संस्थेचे स्वयंसेवक काळजी घेतात.

रुग्णांसोबत येणारे नातेवाईक हे चिंतेने गांजलेले असतात. रुग्णांच्या जेवणाची सोय रुग्णालयातर्फे केली जाते. मात्र, नातेवाईकांना घरून डबा आणणे किंवा बाहेरचे खाणे हाच पर्याय असतो. त्यांचा ताण हलका करण्यासाठी आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्यातून विनामूल्य भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याशिवाय, रुग्णालय प्रशासानाने त्यांना रात्र निवारा, स्वच्छतागृहे याही सुविधा दिल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी जास्तीच्या खिडक्या उघडणे. तपासणी-चाचण्या यांच्यासाठी जास्तीच्या सुविधा देणे. परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य, तसेच, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागाचे अद्ययावतीकरण आदी गोष्टींची सुरूवात अभिजीत बांगर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर झाली आहे. त्यात, नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजन सुविधाही आता समाविष्ट झाली आहे.

वाचनालय पण लवकरच…
एखादी व्यक्ती आजारी पडली तर रुग्णांसहीत नातेवाईकांची तारांबळ उडते. मानसिक ताणतणाव वाढतो, अशावेळी रुग्णांना धीर देण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून आयुक्त अभिजीत बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्याचे ठरवले आहे. त्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ही सुविधाही मिळणार आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

लोणी काळभोर पोलीसांनी पकडला दोन आरोपीतांसह तब्बल १० किलो गांजा..

Next Post

आदर्श मराठी प्राथमिक शाळा राजुरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मातीचे किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदर्श मराठी प्राथमिक शाळा राजुरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मातीचे किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न.

आदर्श मराठी प्राथमिक शाळा राजुरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मातीचे किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In