पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- सदरबाबत अधिक माहिती अशी की, मा. पोलीस आयुक्त रितेश कुमार सो. यांनी पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर लागलीच त्यांनी आयुक्तालयातील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाऊ नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, आमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चो-या करणारे तसेच शरीर व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांचे हालचालीवर नजर ठेवून त्यांचेविरूद्ध कठोर कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबतचा आदेश पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.
मा. वरिष्ठांचे आदेशाने तसेच गोपनीय बातमीदारांचे मार्फतीने लोणी काळभोर पोलीस स्टेशन हदीतील बेकायदेशीर आमली पदार्थ विक्री बाबत अधिक माहिती घेतली असता गायकवाडवाडी रोड, सिद्धीविनाय पार्क शेजारी, सोनवणे यांचे गाई व म्हशीचे गोठयाचे ठिकाणी वडकी, ता. हवेली, जि. पुणे येथे बेकायदेशीर आमली पदार्थ विक्री चालते अशी माहिती सुभाष काळे, पोलीस निरिक्षक (गुन्हे), लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे यांना त्यांचे गोपणीय बातमीदारांमार्फत मागील काही दिवसांपूर्वी मिळालेली होती. सदर बातमीचे अनुशंगाने लोणी कळभोर पोलीस स्टेशन येथील तपास पथकाची टीम ८ दिवसांपासून त्यांचेवर सापळा रचुन त्यांचे संशयितांचे हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन होती. आज रोजी गोपनिय बातमीदाराने खात्रीशीर बातमी दिली की, वडकी, गायकवाड वाडी, सिध्दीविनायक पार्क शेजारी, सोनवणे यांचे गायी म्हशींचे गोठयाचे जवळ दोन इसम त्यापैकी एकाचे वय अंदाजे २४ वर्षे त्याचे अंगामध्ये काळसर रंगाची फुलपेंन्ट व फुल बाहयांचा फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट व दुसऱ्या चे अंगामध्ये निळया रंगाचा बरमोडा व हाफ बाहयांचा आकाशी रंगाचा टी शर्ट अशा वर्णनाचे कपडे परिधान केलेले इसम त्याचे हातामधील पिशवीमधील गांजा विकत आहेत. वगैरे बातमी प्राप्त झाल्याने लागलीच सदर बातमीचा आशय बजरंग देसाई, मा. सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांना कळविला त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर श्री. दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सो. यांना सदरबाबत कायदेशीर बाबीची पुर्तता करणेबाबत आदेश दिल्याने त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे टीम यांनी सोनवणे यांचे गायी म्हशींचे गोठयाचे जवळ, वडकी, गायकवाड वाडी येथे सापळा रचुन थांबले असता दिनांक २२/०२/२०२३ रोजी १९ / १८ वा चे सुमारास बातमीदाराने वर्णन सांगीतल्या प्रमाणे दोन इसम सोनवणे यांचे गायी म्हशींचे गोठयाचे जवळ, वडकी येथे आले त्यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व स्टाफचे मदतीने यशस्वी छापा कारवाई केली व शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) राजेशकुमार विजय वय २३ वर्षे रा. सध्या गायकवाड वाडी रोड, सिद्धीविनायक पार्क शेजारी, सोनवणे यांचे गायी व म्हशीचे गोठयाचे ठिकाणी, वडकी ता. हवेली जि. पुणे (मुळ राहणार मोहनपुर, वैशाली, बिहार) २) राजकिशोर यादव वय १९ रा. सध्या गायकवाड वाडी रोड, सिध्दीविनायक पार्क शेजारी, सोनवणे यांचे गायी व म्हशीचे गोठयाचे ठिकाणी, वडकी ता. हवेली जि. पुणे (मुळ राहणार मोहनपुर, वैशाली, बिहार बिहार) असे असल्याचे सांगीतले. त्यांची अगझडती घेतली असता त्यांचेकडे पांढऱ्या रंगाचे पशु आहार खाद्याचे पोते असुन त्यामध्ये १,४०,०००/- रू किंमतीचा हिरवट रंगाचा पाला (गांजा) खाकी रंगाचे चिकटपट्टीने गुडाळलेली असे तीन बंडल तसेच एका लाल व निळया रंगाचे कॅरीबॅगमध्ये सुट्टा हिरव्या रंगाचा पाला (गांजा) असा एकूण १० कि. ग्रॅ. वजनाचा गांजा त्यांचे ताब्यात मिळून आला. त्याबाबत त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या पिशवीमध्ये गांजा असल्याचे सांगुन सदर गांजा विक्री करण्यासाठी आणला असल्याचे सांगितले. सदरचा गांजा जप्त करण्यात आलेला असुन त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुभाष काळे, पोलीस निरिक्षक (गुन्हे), लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे हे करत आहेत
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. रितेशकुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो परिमंडळ-५ मा.श्री. बजरंग देसाई सहा. पोलीस आयुक्त सो, हडपसर विभाग, मा.श्री. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, यांचे मार्गदशनाखाली मा. सुभाष काळे पोलीस निरीक्षक सतो, (गुन्हे). तपास पथकातील अधिकारी पोउपनि गोरे व त्यांचे सोबत पो. हवा पोहवा / ४३२ गायकवाड, पो. हवा २४३४ बोरावके, पो.ना. ६५०३ साळुंखे, पो ना/७६९५ जाधव, पोना / ७३३५ नागलोत, पो.ना/ ६४८२ देवीकर, पो. शि/ १०३७२ पवार, पोशि/ १२००५ शिरगीरे, पो शि/ ४७११ कुदळे, पोशि/ ३२९ वीर, पो.शि. ढमढेरे, मपोशि विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.

