श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलीसाठी जेव्हा तिचे जन्मदाचे शैतान बनतात तेव्हा तिचं जगणं मुश्किल होते. अशीच एक घटना बीड जिल्हातील अंबाजोगाई तालुक्यातील दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुली बरोबर घडले, या नराधम माता पित्याने दहावीत शिक्षनाऱ्या अल्पवयीन मुलीचे तिच्या इच्छे विरुद्ध जबरदस्तीने तिचे लग्न करून दिले.
लग्नानंतर या अल्पवयीन मुलीने सासरी नांदण्यास नकार दिल्याने माहेरच्या मंडळीनी तिला अज्ञात स्थळी सोडून दिले. ही घटना समोर येतात संपूर्ण बीड जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. या बालविवाह प्रकरणी मुलीचे आई-वडील, आजोबा, मामा, सासू, सासरा, पती यांच्यासह सात जणांवर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार,अंबाजोगाई तालुक्यातील दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या मर्जी वीणा जबरदस्तीने दि. 16 फेब्रुवारी रोजी लाऊन देण्यात आले. या बालविवाहात काही अडचण येऊ नये म्हणून मुलीला अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात देण्यात आलं. तर विवाह केज तालुक्यातील मामाच्या गावी शेतात लावून देण्यात आला.
दरम्यान त्या मुलीने सासरच्या मंडळींला हे सांगितल की मला हे लग्न मान्य नाही. मी येथे राहाणार नाही. असे स्पष्ट सांगितले. सासरच्यांनी यांची माहिती माहेरच्या लोकांना दिली. माहिती मिळताच वडील, आजोबा आणि मामांनी औरंगाबाद गाठून अल्पवयीन विवाहित मुलीला एका वाहनात बसवून अज्ञात स्थळी सोडून दिले. ती भटकत असताना त्या मुलीने हा प्रकार एका महिलेला सांगितला असता तिने मदत करत मुलीला पोलीस ठाण्यात सोडले.
सदरील अल्पवयीन विवाहित मुलीने पोलिसांना हकीकत सांगितली असता दौलताबाद जिल्हा संभाजीनगर पोलीसांनी माहिती युसुफ वडगाव पोलीसांना दिली. येथे आई-वडील, आजोबा, मामा, पती, सासु, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348