पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:-दि. २२/०२/२०२३ रोजी पुणेश्वर मित्रमंडळ चौक में डीएल तरु फ्रेश फिश मर्चंट समोर रिक्षाचे जाडबाजुला मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली. सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळून आल्याने ७ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून जुगारातील रोख रक्कम, ९,५८०/- व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले ७ इसम व जुगार अड्डा चालक असे एकुण १८ इसमाविरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुरनं ४५ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता चंदननगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्रीरंगनाथ पोकळे, गा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील पोलीस अंमलदार अजय राणे, मनिषा पुकाळे, तुषार मिवरकर, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.