Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

“चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा कापुन खुन करणाऱ्या पतीस सासवड पोलीसांकडुन १८ तासात अटक “

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 28, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
“चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा कापुन खुन करणाऱ्या पतीस सासवड पोलीसांकडुन १८ तासात अटक “
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

सासवड पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- काल दि. २५/०२ / २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वा. दरम्यान सासवड पोलीसांना खबर मिळाली की, सासवड जवळ वाघापुर रोडवरील आंबोड़ी फॉरेस्ट मध्ये एक महिला जखमी अवस्थेत पडलेली असुन तिचे कपड़े रक्ताने भरलेले आहेत. तिचे जवळ २ वर्षाचे लहान मुल रडत बसले आहे. सासवड पोलीसांनी तात्काळ तेथे जावुन त्या जखमी महिलेस व लहान मुलास अॅम्बुलन्समधुन सासवड रुग्नालय येथे आणले. तेथे डॉक्टरांनी महिलेचा कशानेतरी गळा कापल्याने मयत झाल्याचे सांगितले. सुरवातीला तिची ओळख पटवणे अवघड होते परंतु तिचे जवळील पिशवीत एक चिठठी मिळुन आली त्यावर नाव व मोबाईल नंबर होता. त्यावर फोन करून माहिती घेतली असता तिचे नाव अनिता महेश बनकर, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे असल्याचे समजले. पोलीसांनी नातेवाईकांचा शोध घेवून मयत महिलेची ओळख पटवल्यानंतर समजले की, पती महेश व मयत पत्नी अनिता यांचेत कौटुंबिक वाद आहेत व दोघे पती पत्नी एकमेकांपासून वेगळे पती महेश हा त्याचे आई, भाऊ व मुलगी सह आंजलीनगर, कात्रज, पुणे व पत्नी अनिता हि आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, पुणे येथे राहात असल्याचे चौकशीत समजले, दोघा पती पत्नीचे वाद असल्यामुळे व पती महेश बनकर याचा फोन सायंकाळी ६:०० वा. पासुन बंद येत असल्याने सासवड पोलीसांना संशय वाढला की, अनिता हिचा खुन हा तिचा पती महेश बनकर यानेच केला असावा. दरम्यान मयत अनिता हिचे नातेवाईकांनी सासवड पोलीस स्टेशन येथे पती महेश बनकर यानेच अनिता हिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला जिवे ठार मारले आहे व लग्न झालेपासुन अनिता हिला पती महेश बनकर व सासु कमलाबाई बनकर हे तिचे चारीत्र्यावर संशय घेवुन शारीरीक, मानसिक त्रास देत होते. सदर बाबत ससवड पोलीस स्टेशन येथे गुरजी.नं. ११९ / २०२३ भा.दं.वि.का.क. ३०२, ३०४(२) ४९८ (अ), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला…

पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी तात्काळ सहा. पोलीस निरीक्षक विनोद महागडे, गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे यांना पती महेश बनकर यांचा शोध घेवून ताब्यात घेण्यास सांगितले त्याप्रमाणे वरील पथकाने महेश बनकर राहात असले ठिकाणी आजलीनगर, कात्रज, पुणे येथे जावुन शोध घेतला तो मिळुन आला नाही. त्यानंतर त्याचे मुळ गावी माळशिरस, ता. पुरंदर येथे जावुन शोध घेतला तो मिळुन आला नाही. मयत अनिता हिचे पोस्ट मॉर्टम झाले पण जो पर्यंत “पोलीस आरोपीस अटक करत नाही तो पर्यंत आम्ही अनिताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही” असे तिचे नातेवाईकांनी आग्रह धरला.

तपासा दरम्यान आज सकाळी ११:०० वा. पोलीस पथकास बातमी मिळाली की, महेश बनकर हा नाझरे येथिल हॉटेल मयुरमध्ये बसला आहे. वरील पोलीस पथक तात्काळ तेथे पोहाचले परंतु पोलीस पाहोचण्यापुर्वी १० मिनीट महेश बनकर हा नायगांवच्या बाजुने पांढरे रंगाच्या स्कुटी मोटार सायकलवर गेल्याचे समजले. पोलीस नायगावच्या बाजुने गेले असता रोडवर हॉटेल आकाश समाधानचे समोर महेश बनकर यांची पांढरे रंगाच्या स्कुटी मोटार सायकल दिसली. पोलीस गाडीतुन खाली उतरत असल्याचे पाहताच महेश बनकर हॉटेलच्या पाठिमागे शेतात पळत सुटला. परंतु पोलीसांनी त्यास काही अंतरावर पाठलाग करून ताब्यात घेतले व त्याने सांगितले की, “आम्हा पती पत्नीचे वाद होत असत. आम्ही वेगवेगळे राहात होतो. परंतु तिचे वागणे बरोबर नव्हते, नको त्या लोकांशी ती बोलत होती, माझे ऐकत नव्हती. म्हणुन तोच राग मनात धरून तिला गोड बोलुन पुणे येथून मोटार साकलवर बसवुन सासवड येथे घेवुन आलो व फॉरेस्टमध्ये नेवुन पत्नी अनिता हिचा चाकुने गळा कापुन खुन केला” असल्याची कबुली दिली. सासवड पोलीसांनी पत्ती व सासु यांना गुन्हयाचेकामी अटक केली आहे.

१) पती महेश पंडीत बनकर, वय २४ वर्षे, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे. – सध्या अंजलीनगर, कात्रज, पुणे. (२) सासु– कमलाबाई पंडीत बनकर, वय ४५ वर्षे, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे. – सध्या अंजलीनगर, कात्रज, पुणे.

वरील कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सो, बारामती आनंद भाईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, भोर विभाग धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन आण्णासाहेब घोलप, सहा. पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस नाईक गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे, प्रतिक धिवार, सुनिल कोळी (सायबर पोलीस स्टेशन), पोलीस मित्र सचिन चंदनशिव, शुभम घोडके यांचे पथकाने केलेली आहे.

Previous Post

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते आर्वी येथे पाणी पुरवठा योजनेच्या विकास कामाचे भूमिपूजन.

Next Post

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाचनालाय इमारतीचे भूमिपूजन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाचनालाय इमारतीचे भूमिपूजन.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाचनालाय इमारतीचे भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In