संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- जल जीवन मिशन २०२२ – २०२३ अंतर्गत ग्रामपंचायत आर्वी येथे नवीन पाणीपुरवठा योजने अंतर्गत १ कोटी २५ लक्ष रुपये किंमतीच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेच्या विकासकामाचे भूमिपूजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या योजनेच्या माध्यमातून आर्वी गावातील लोकांची पाण्याची समस्या पुर्णपणे दूर होण्यास मदत होईल असा विश्वास सरपंच शालुताई लांडे आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे तसेच त्यांनी ही योजना मंजूर केल्या बद्दल आ. धोटे यांचे आभार व्यक्त केले आहे.
या प्रसंगी आर्वीच्या सरपंच सौ. शालुताई लांडे, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय उपरे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, खेडे साहेब, तलाठी सुरेखा रामटेके, उषा उपरे, दादाजी जावडेकर, तमुस अध्यक्ष मारोती शिवणकर, बाबुराव बोढाले, माजी उपसरपंच सुभाष काटवले, विलासराव मस्की, माजी सरपंच चव्हाण, उपविभागीय अभियंता, यासह आर्वी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.