पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
पी सीबी, गुन्हे शाखा, पुणे शहर अंतर्गत एमपीडीए कारवाई
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे राम उर्फ राम्या गंगाधर क्षिरसागर व २२ वर्षे, रा. ताडीगुत्ता, कोद्रे वस्ती, भारत गॅस गोडऊनजवळ, मुंढवा, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार, पालघन, चाकू या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व नालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमुद इसमाचे विरुध्द एम. पी. डी.ए. कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नगूद इसगास स्थानबध्द करण्यामध्ये श्री प्रताप मानकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पो. स्टे. पुणे शहर व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली… मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणाया व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ०७ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

