Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर, विविध सामाजिक संस्थाचा सत्कार, लाडूतुला करून ऍड. संजय धोटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 1, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर, विविध सामाजिक संस्थाचा सत्कार, लाडूतुला करून ऍड. संजय धोटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजुरा विधानसभेतील गतवैभव पुन्हा प्राप्त करू. येणाऱ्या विधानसभेत विजय भाजपाचाच.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 28 फेब्रुवारी:- पक्षाचा पराभव हा कार्यकर्त्यांचा पराभव असून पराभवाने खचून न जाता खोडंबलेली विकासगंगा ओढून आणण्यासाठी पुन्हा राजुरा विधानसभेला गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता कार्यकर्त्यांनी वेगाने कामाला लागावे. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणूकांत भारतीय जनता पक्षाचा विजय व्हावा असा संकल्प करण्याचे आवाहन सुधीर मुनगंटीवार, मंत्री – वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय यांनी ऍड. संजय धोटे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन केले. यावेळी हंसराज अहिर यांच्या समवेत अनेक मान्यवरांनी ऍड. संजय धोटे यांना शुभेच्छा देताना आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर व उपजिल्हा रुग्णालय, राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ऍड. संजय धोटे यांच्या वाढदिवसा निमित्य दि. 28 फेब्रुवारी ला भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले तसेच विविध सामाजिक सेवाभावी संस्था, बचत गट यांचा सत्कार व ऍड. संजय धोटे यांची लाडूतुला कार्यक्रम संपन्न झाला. सेलीब्रेशन (नक्षत्र) हॉल चुनाळा रोड, राजुरा येथे या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राष्ट्रीय अध्यक्ष, इतर मागासवर्ग आयोग हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वने तथा मत्स्य व्यवसाय, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जीवती, गोंडपिपरी या चारही तालुक्यातील भाजपा तालुका अध्यक्ष यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन, लाडू तुला व राज्यगीत गायन करण्यात आले. राजुरा शहरातील अनेक महाविद्यालयीन विध्यार्थी, युवक, युवती, सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदात्यांना आयोजका तर्फे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. आरोग्य शिबिरात बालरोग तपासणी, रक्तदाब, मधुमेह, स्त्रीरोग तपासणी तसेच इतर आजारांची तपासणी करून त्यांना मोफत औषध वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या समाजसेवी संस्थाचा सन्मान करण्यात आला.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार, महिला सक्षमीकरण, उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार, उद्योजक व प्रगतिशील शेतकरी समूहांचा सत्कार, व्यसनमुक्ती कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे करणाऱ्या व्यक्ती व मंडळांचा सत्कार तसेच युवा टॅलेंट यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बी.यु. बोर्डेवार यांनी केले तर प्रास्ताविक निलेश ताजणे यांनी केले. आभार राजुरा तालुका महामंत्री भाजपा दिलीप वांढरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अविनाश जाधव, सतीश धोटे, गणेश रेकलवार, संदीप गायकवाड, राधेश्याम अडाणीया, महादेव तपासे, संदीप पारखी, रवि गायकवाड तथा ऍड. संजय धोटे मित्र परिवार आयोजन समितीने अथक परिश्रम घेतले.

Previous Post

अहेरी तालुक्यातील चिंतलगुड्डा येते टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न.

Next Post

12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनिवर मुख्याध्यापकानी केला विनयभंगाचा प्रयत्न, हिंगणघाट पोलिसांनी शिक्षकास ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनिवर  मुख्याध्यापकानी केला विनयभंगाचा प्रयत्न, हिंगणघाट पोलिसांनी शिक्षकास ठोकल्या बेड्या.

12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनिवर मुख्याध्यापकानी केला विनयभंगाचा प्रयत्न, हिंगणघाट पोलिसांनी शिक्षकास ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In