मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. वर्धा शहराला लागून असलेल्या नागठाना परिसरात असलेल्या एका शेतात अवैधरित्या देहविक्रीचा व्यवसाय करण्यात येत होता. मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून या अवैध देहविक्रीचा व्यवसायाचा भंडाफोड केला.
वर्धा लगतच्या नागठाना येथील शेतातील बांधलेल्या झोपडीत जीवन दत्तू मोहरले रा. रोठा वेणी ता. कळंब, जि. यवतमाळ ह.मु. सावंगी परिसर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याने अवैध देहविक्रीचा व्यवसाय लपून सुरू केला. याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. मग पोलिसांनी एक बनावट ग्राहकाने बनून दलाल जीवन मोहरले संपर्क केला. मग त्यांच्यात सौदा पक्का झाला. त्याने तेहत्तीस वर्षीय महिलेस सावंगी पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाच्या सुपूर्द केले आणि या अवैध देहविक्रिचा भांडाफोड झाला.
झटपट पैसे कमवासाठी दलाल जीवन दत्तू मोहरले याने शेतात हा अवैध देहविक्री व्यवसाय सुरू केला होता. सावंगी पोलिसांनी छापा टाकून हा कारवाई केली. यावेळी आरोपीकडून व एका महिलेकडून पाचशेची एक नोट जप्त करण्यात आली. तसेच भ्रमणध्वनी संच, कंडोमचे पाकीट जप्त करण्यात आले. आरोपीवर संशय असल्याने त्याच्यावर आठ दिवसापासून पोलिस पाळत ठेवून होते. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुद्ध कलम ४,५,७ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

