✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- गोपनीय माहितीच्या आधारे अल्लीपूर पोलिसांनी टाकळी (दरणे) मार्गावर नाकेबंदी करून काही वाहनांची तपासणी केली. याच तपासणीदरम्यान एम. एच. २९ बी. ई.६०७० तसेच एम. एच. २९ टी. ३३७०क्रमांकाच्या मालवाहू मध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनातील व्यक्तींना जनावरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची विचारणा केल्यावर ते नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी वाहनांसह जनावरे जप्त केली. तर अरबाज खान तौफिक खान(२०) रा. आर्णी, जि. यवतमाळ तसेच मो. लाईक शमी कुरेशी (२२) रा.यवतमाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून या दोघांना अटक केली आहे.
जप्त करण्यात आलेली १५ जनावरे पडेगाव येथील गो-शाळेत पाठविण्यात आली आहेत. ही कारवाई अल्लीपूरचे ठाणेदार सुनील गाडे मार्गदर्शनात जमादार अजय रिठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली आहे .

