संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- वीर बाबुराव शेडमके अमर रहे,राजमाता राणी हिराई अमर रहे या घोषणा देत जल्लोषात भेदोडा येथे रॅली निघाली, राजुरा तालुक्यातील भेदोडा येथे बुधवार ला सल्ला घागरा शक्ती उदघाटन सोहळा जल्लोषात पार पडला या सोहळ्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष, बापूजी मडावी, उपाध्यक्ष महिपाल मडावी, महासचिव विजय सिंह मडावी, श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख घनशाम मेश्राम, कमलेश आत्राम, शेडमाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी सल्ला घागरा शक्ती सोहळ्याचे उदघाटन करून शहीद विर बाबूराव शेडमाके, राजमाता राणी हिराई आत्राम, राबिन हूड सामा दादा कोलाम यांच्या कार्यावर प्रकाश टाकत गावकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात शाळकरी मुलींनी आदिवासी ढेमसा गीतांवर जल्लोषात नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणपत आत्राम, बंडू उईके, रमेश आत्राम, शामराव आत्राम, इंदिरा आत्राम, शशिकला आत्राम, सोनी आत्राम, संगीता टेकाम, विमालबाई सिडाम, वैष्णवी आत्राम, महिमा आत्राम, साक्षी आत्राम, अंकिता आत्राम, कृतिका आत्राम यांनी प्रामुख्याने परिश्रम घेतले.