संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीला घेऊन राज्य सरकारी -निमसरकारी, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यासह अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून राजुरा येथील तहसील कार्यालय परिसरात आंदोलन सुरु आहे.
या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी एक दिव्यांग रमेश महादेव शिंदे ज्याला दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नव्हती सभा मंडपात आला. त्याने आपल्या गोड आवाजात गीत सादर करून आपल्या परिवाराची व्यथा मांडली. या दिव्यांग व्यक्तीची कला व त्याच्या परिवाराची आर्थिक स्थितीची माहिती घेऊन क्षणाचाही विलंब न करता आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी या दिव्यांग व्यक्तीला चार हजार सहाशे रुपयांची रोख रक्कम देऊन आपल्या सामाजिक बांधीलकी जोपासली.
सध्या सोशल मीडियावरून कामं बंद आंदोलनात सहभागी कर्मचऱ्यांनावर टिकेची तोफ उसडत आहेत. परंतु या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधीलकी आहे हे विसरून किंवा नजरअंदाज करून चालणार नाही हे ही तितकेच सत्य आहे. आंदोलनात सहभागी कर्मचारी यांनी स्वतः पुढाकार घेत त्या दिव्यांग व्यक्तीला आर्थिक मदत केली. संपात सहभागी शिक्षक असतील किंवा अन्य विभागाचे कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयीन कामाव्यतिरिक्त सामाजिक जाणीव ठेवून अनेक समाजउपयोगी कार्य केली आहेतच.