Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महाराष्ट्र

महाड सत्याग्रह – एक सामाजिक क्रांती

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 21, 2023
in महाराष्ट्र, साहित्य /कविता
0 0
0
महाड सत्याग्रह – एक सामाजिक क्रांती
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखक: सुनिल ब. गायकवाड रा. पुणे


महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाड सत्याग्रह विशेष लेख:- महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी तथाकथीत अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून भारतात साजरा केला जातो. ही डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.

भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना तथाकथीत उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती. ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नव्हती.

कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख त्यांत सहभागी होते. यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ.आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते. १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. डॉ.आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले. त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.

सत्याग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार –
जरी महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्या वरून पाणी घेण्यास मनाई होती. चवदार तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरुन सर्वजण निघाल्या नंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, “तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे.” धर्म धोक्यात आल्याचे अन्य जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले. त्यातून अन्य जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. हा अन्य जातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरुन सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये देखील ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्या नंतरही हिंसेला सामोरे जावे लागले. ह्या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि, स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करुन चुक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले.

विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्यामूळे गावातील सनातनी हिंदुंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध “हिंसा करू नका” असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते. नंतर १९ मार्च १९४० रोजी डॉ.आंबेडकर यांनी महाडमधे १४वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केला. महाड शहरात डॉ. आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशीं महाड नगरपालिका प्रेसिडेंट, ॲड. विष्णु नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करुन आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. डॉ. आंबेडकर यांनी तेव्हा उत्तरादाखल एक भाषणही केले. खोडके यांनी दिलेले हे मानपत्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण महाराष्ट्र सरकार कडुन प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे “खंड १८, भाग २ या मध्ये उल्लेख केले गेले आहे. खोडके यांनी १९३१ पासुन डॉ. आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता. १९५७ मध्ये प्रकृती अस्वास्थ्य मुळे वकिली करणे बंद केले. पुढे ४ मार्च १९५९ रोजी त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या सन्मानार्थ चवदार तळ्या जवळील एका रस्त्याला “ॲड. व्ही.एन. खोडके मार्ग” असे नाव देण्यात आले.

दलित महिलांचा सहभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आवाहन.

ह्या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने, आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले आणि यापुढे आपली जात दाखवणारी कोणतीही लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी व पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही, असे उपस्थित स्त्री-पुरुषांना आवाहन केले. तत्कालिक स्त्रिया तेव्हा गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. डॉ.आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पुर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांत घडताना दिसू लागली

महाड पाणी स्पर्श बंदि उठत असताना….

आंदोलनकर्त्या बांधवांच्या व्यवहारातील विशेषता
1) विधायक मार्गाने मागणी केली गेली
2) कोणत्याही स्थितीत ग्रामस्थांवर प्रतिहल्ला न करण्याचा बाबासाहेबांचा आदेश पाळला गेला.
3) आंदोलनात सर्व जातींचा सहभाग घेतला
4) जातीयवादी न्यूनता दाखवणारी लक्षणे आंदोलकांनी सोडली. उदा. भगिनींकडून- तोकडे लुगडे, बांधवांकडून- हातात काठी

दलितेतर बांधवांच्या व्यवहारातील विशेषता
1) नगरपालिकेचा मुक्त प्रवेशाच्या कायदा अंमलबजावणीचा निर्णय.
2) सभेसाठी बाबासाहेबांना निमंत्रण,
3) नगर पालिकेकडून आंदोलनानंतर पुढे बाबासाहेबांचा गौरव.
4) आंदोलन यशस्वी करणारेंची गावातील रस्त्यांना नावे.

एकूणच आपण सर्वांनीच महाड गावातील या सामाजिक क्रांतीपासून योग्य बोध घेतला पाहिजे, आपापल्या गावागावांतील कुप्रथा कायमच्या सोडून सर्व जातींमध्ये परस्पर सलोखा निर्माण करणाऱ्या काही नवीन प्रथा स्वीकारण्याची सुरवात करायला हवी, आणी ही सुरवात शहरी वस्ती अथवा ग्रामपातळी सोबत कौटुंबिक व व्यक्तिगत स्तरावर देखील व्हायला हवी.

Previous Post

माजी सैनिक – दलित महिलेचे उपविभागय कार्यालया समोर आमरण उपोषण 3 दिवशी लेखी आश्वासन दिल्यामुळे मागे.

Next Post

पिंपरी चिंचवड: पिस्टल व गांजा सह सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पिंपरी चिंचवड: पिस्टल व गांजा सह सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या.

पिंपरी चिंचवड: पिस्टल व गांजा सह सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In