संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे शेतशिवरात वीज पडून ७ व्यक्ती जखमी झाले होते. सर्व जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात येऊन त्यांचेवर उपचार करण्यात येत आहेत. यात मधुकर धानोरकर वय ५५, मंधा धानोरकर वय ५०, मृणाल बोबडे वय १८, उषा चौधरी वय ५०, किरण चौधरी वय ४८, अर्चना चौधरी वय ३५, माधुरी मोरे वय ३५ आदींचा समावेश आहे. सध्या सर्वांची प्रकृती ठीक आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे आमदार सुभाष धोटे यांनी घटनेची माहिती मिळताच भ्रमणध्वनी व्दारे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देवून सर्व जखमींची काळजी घेण्यास सांगितले होते. आज प्रत्यक्षात रुग्णांची भेट घेऊन भरती आलेल्या सर्व रुग्णांच्या तब्येतीची विचारपुस केली. त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. लहूजी कुळमेथे, जेष्ठ नेते, कृ. उ. बा. स. माजी सभापती आबाजी ढुमणे, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, सरपंच विहिरगाव ॲड. रामभाऊ देवईकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, राजकुमार दामेलवार, भास्कर मोरे, डॉ. शंकर बु-हाण यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते.

