संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 27 मार्च:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राजुरा नगराचा वर्ष प्रतिपदा उत्सव नुकताच संपन्न झाला. मुख्य संघस्थान गढी वॉर्ड राजुरा येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात तालुका संघचालक राजेंद्रजी येनुगवार यांनी तालुका आणि नगराच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. या उत्सवाला वक्ता म्हणून बाळकृष्ण गोंदे उर्फ बाळूमामा विभाग संयोजक धर्म जागरण बल्लारपूर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्रमुख वक्ते यांनी संघ कार्याचे महत्त्व आणि हिंदू समाज एकत्र येण्यासाठी आणि संघकार्याचे महत्त्व पाटवून दिले. शैलेशजी पर्वते जिल्हा कार्यवाह रा. स्व.संघ चंद्रपूर. आणि नगर कार्यवाह महेशजी समर्थ यांची मंचावर उपस्थिती होती. उत्सवपूर्वी घोष वादन पूर्णगणवेशात नगरातील मुख्य मार्गावरून पथसंचलन झाले. उत्सवाला पूर्ण गणवेशात स्वयंसेवक बंधू उपस्थित होते.