पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. १३/०३/२०२३] रात्री २१/४५ या सुमारास फिर्यादी है रसराज बीअर शॉपी, रोझरी शाळे जवळ, करण प्लाझा बिल्डींग, शॉप नं ०४, वारजे पुणे येथे असताना भैय्या शेडगे नावाचा इसम व ज्याचा अनोळखी साथीदार हे फिर्यादीच्या दुकानात येउन दोन टुयबर्ग बिअरचे बॉक्स जबरदस्तीने हिसकावून घेउन जात असताना त्यातील भैय्या शेडगे यांने धमकावून व दरमोडा घातलेल्या इसमाने तु कोणाला पैसे मागतोस तुला दुकान चालवायचे तर तुला हप्ता दयावा लागेल, आम्ही इथले भाई आहोत असे बोलला, मैया शेडगे याने फिर्यादीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला व रिक्षाचा चालक असलेल्या अनोळखी इसनाने ही खाली उतरवून फिर्यादीस हप्ता देण्यासाठी धमकावले म्हणून माझी भैय्या शेडगे व त्याचे बरोबर असणाया वर नमूद वर्णानाच्या दोन अनोळखी इसमा विरुध्द कायदेशीर तक्रार दिल्याने वारजे माळवाडी पो.स्टे १०४ / २०२३ भा. द. विकलम ३९२.३८४, ५०६ ३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान गुन्हयातील फिर्यादीच्या बीअर शॉपी येथिल सी.सी.टी की फुटेज तपासणी करून फुटेजच्या आधारे आरोपी नामे १) लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडवा शेंडगे, वय २३ वर्षे, रा. सी बिल्डींग, फैलट नं ४०८, रा. म्हाडा वसाहत, वारजे, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथिदार २) स्वामी ऊर्फ काळु ज्ञानेश्वर खवळे, वय २२ वर्षे, रा. फ्लॅट नं ६१४ सी बिल्डींग म्हाडा विसाहत, वारजे, पुणे (टोळी सदस्य ) ३) आदित्य गणेश मंडलीक वय २० वर्षे, रा. फ्लैट नं ७१२ डी बिल्डींग, म्हाडा वसाहत, वारजे, पुणे (टोळी सदस्य ) ४) अनिल बापु बनसोडे, वय ३० वर्षे, रा. फ्लॅट नं ३०३. डी बिल्डींग, म्हाडा वसाहत, वारजे पुणे (टोळी सदस्य ) हे आरोपी निष्पन्न केले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वर नमूद अटक आरोपी यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपी नामे लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडवा शेंडगे (टोळी प्रमुख) हा प्रत्येक गुन्हयामध्ये गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात का कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव श्री. डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे यांनी मा. श्री सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त, परि-३ पुणे शहर यांचे मार्फतीने मा. श्री राजेंद्र डहाळे साहेब अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे यांना सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपी नामे लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडवा शेंडगे याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी नामे लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडवा शेंडगे (टोळी प्रमुख) याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार याना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असून यातील आरोपी यांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकिय कामात अडथळा निर्माण करणे गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र जवळ बाळगणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (11) ३ (४) या कलमाचा समावेश करणे बाबत मा. श्री राजेंद्र डहाळे साहेब, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे यांनी मंजुरी दिलेली आहे. त्याप्रमाणे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १०४ / २०२३ या गुन्हयामध्ये मोक्का कायद्याची कलने समाविष्ठ करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती रुक्मिणी गलंडे, सहा पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग पुणे शहर हया करीत आहेत.
मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देवून फटोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तीक मार्गदर्शन करून गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सदरची कामगीरी मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर मा.श्री. संदिप कर्णीक, सहआयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेंद्र डहाळे साहेब, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे मा. श्री सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त परि-३ पुणे शहर, मा. श्रीमती रुक्मिणी गलडे, हा पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस दागेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. दत्ताराम बागवे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत पडवळे, अंमलदार पोना सचिन कुदळे, पोना अमोल मिस पो.ना अतुल भिंगारदिवे, पोशि विजय खिलारी, पोशि नितीन कातुर्डे यांनी केली आहे.