अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन सावनेर,05 एप्रिल 2023:- महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र वीर सावरकरांचे विचार व आदर्श जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे ३० मार्च ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीत वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.
५ एप्रिल ला सावनेर शहरातील सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत भारतीय जनता पक्ष, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने या महान देशभक्त स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या गौरव यात्रेला सुरुवात मुरलीधर मंदिर येथून होईल. हिंदुत्ववादी संघटना, वीर सावरकर प्रेमी आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ.राजीव पोतदार यांनी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये केले.या वीर सावरकर गौरव यात्रेत सहभागी व्हा. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्हा ग्रामीण सरचिटणीस इमेश्वर यावलकर, जिल्हा ओबीसी आघाडीचे अँड.प्रकाश टेकाडे,शहर विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामराव मोवाडे,शहर भाजप अध्यक्ष मंदार मंगळे,माजी नगरसेवक राजू घुगल,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष पिंटू सातपुते आदी उपस्थित होते.दिगंबर सुरतकर ,मनीष खंगारे आदींची पत्रपरिषदेत प्रमुख उपस्थिती होती.
५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा.होणाऱ्या या वीर सावरकर गौरव यात्रेचे सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे निमंत्रक रामराव मोवाडे यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन प्रत्येकांनी घराच्या अंगणात रांगोळी,पताका लावून, फुलांचा वर्षाव करून या गौरव यात्रेचे स्वागत करावे अशी विनंती केली आहे.भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मंदार मंगळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकार बांधवांना गौरव यात्रेत सहभागी होणा-या लोकांसाठी अल्पोपाहार,शरबत आदी व्यवस्था असल्याची माहिती दिली.