पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
मुंढवा पोलीस ठाणे पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०१/०४/२०२३ रोजी एका अज्ञात इसमाने दुचाकीवरुन येवुन गुन्हयातील फिर्यादी हे बाबा कल्याणी रोडवर केशवनगर या ठिकाणी पायी जात असताना, त्यांच्या हातातील मोबाईल फिर्यादी यांना मारहाण करून जबरीने चोरून नेला होता. सदरबाबत मुंढवा पोलीस ठाणे गुरनं. ११९ / २३ भादवी ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अजित लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे, मुंढवा पोलीस ठाणे यांचे आदेशानुसार मुंढवा तपास पथकातील अधिकारी व अंमलदार वरील गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना राजगस्तीचे दरम्यान नमुद गुन्हयात अज्ञात चोराने वापरलेल्या दुचाकी वाहनावर एक सशईत इसम फिरताना दिसल्यावर त्याचेकडे वाहनाबाबत चौकशी केली असता, त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यास पुन्हा ताब्यात घेवुन, सदर इसमाची अंगझडती घेतली असता, त्याचेजवळ वरील गुन्हयातील जबरीने चोरलेला मोबाईल मिळुन आला. तसेच तो वापरत असलेले वाहनदेखील चोरीचे असल्याची खात्री झाली. सदर वाहना बाबत मुंढवा पोलीस ठाणे गुरनं १००/२३ भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुंढवा पोलीसांनी जबरी चोरी व वाहनचोरी असे दोन गुन्हे उघड केले असुन अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मनिष सुजित नागपुरे वय २५ वर्षे, रा. सर्वे नं. ९४. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे असे असुन
त्याचेवर यापूर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. पो.स्टे. गु.र.नं. व कलम
समर्थ पो.स्टे. पुणे शहर गु.र.नं. १५०/२०१६ भा.द.वि. कलम ३७९
चंदननगर पो.स्टे. पुणे शहर गु.र.नं. ३० / २०१७ भा.द.वि. कलम ३९२, ३४ मुंढवा पो.स्टे. पुणे शहर गु.र.नं. ३२७ / २०२० आर्म अॅक्ट कलम ४(२५)
मुंढवा पो.स्टे. पुणे शहर गु.र.नं. २२६ / २०२१ आर्म अॅक्ट कलम ४ (२५)
.मुंढवा पो.स्टे. पुणे शहर गु.र.नं. १६२ / २०१८ म.पो. का. कलम १२२ (क) ६.
मुंढवा पो.स्टे. पुणे शहर गु.र.नं. १३१ / २०१९ म.पो.का. कलम १२२ (क)
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा,मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर, श्री बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रदिप काकडे, मुंढवा पोलीस ठाणे, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोलीस अंमलदार, वैभव मोरे, महेश पाठक यांनी केली आहे.

