सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्हातील रिसोड तालुक्यातील चांडस व नावली या गावातील वर्षानुवर्षे रस्त्यांसह अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबीत आहेत. चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावे या करिता इथल्या नागरिकांनी जनआंदोलन ही उभारल, सरकारही दरवर्षी विविध रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. सध्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून चांडस ते नावली या 12 किमी रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु रस्त्याचा दर्जा निकृष्ठ असल्याचा आरोप करत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा उचलत रविवारी काम बंद पाडले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमार्फत मंजूर झालेला या रस्त्याचे उद्धघाटन २०१९ मध्ये आमदार अमित झणक यांच्या हस्ते करण्यात आले होते तर प्रत्येक्ष काम सुरू व्हायला ग्रामस्थांना ४ वर्ष वाट बघावी लागली. काम सुरू झाले परंतु ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले व त्यांनी थातुरमातुर होत असलेल्या या कामाबाबत आवाज उठवला. रस्ता काम करताना डांबर वापर न करता तसेच रस्त्यावरील माती कचरा बाजूला न करता खडी पसरवून काम सुरू असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहेत. काम थांबवून माती बाजूला करत त्यांनंतर रस्त्यावर योग्य प्रमाणात डांबर घालून पुन्हा खडीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरख पाटील बोरकर, जांब अढावचे सरपंच सुधाकर आढाव, भगवान शिंदे, गोपाल वाघ, राजू आढाव, रामदास आढाव, गजानन आढाव, निवृत्ती आढाव, बाळू झांबरे व इतरही ग्रामस्थ उपस्थित होते.