पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचारी सुनील सकट (वय ३७) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सकट हॉकीपटू होते. सकट यांचे अकस्मात निधन झाल्याचे समजताच पोलिस दलात शोककळा पसरली.
पोलिस कर्मचारी सकट चतुःशृंगी पोलिस ठाण्यात नियुक्तीस होते. गेल्या काही दिवसांपासून ते अर्जित रजेवर होते. रविवारी मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सकट यांना हृदयविकाराचा झटका आला. सकट यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी जाहीर केले. सकट यांनी राष्ट्रीय पातळीवर हॉकी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी श्रद्धांजली अर्पण केली.