सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- शहरातील अकोला नाका परिसरातील टेम्पल गार्डनचे 3 वर्षांपूर्वी लोकार्पण करण्यात आले, गार्डनच्या कामाकरिता करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला परंतु अद्याप गार्डन सुरू न झाल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने नगर परिषद कार्यालया समोर 1 मार्च ते 3 मार्च पर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आम आदमी पार्टीचे नेते राम पाटील डोरले यांनी नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
परंतु एक महिना उलटला तरी प्रशासनाने टेम्पल गार्डन सुरू करण्या करीता ठोस पावले उचलली नसल्याने आम आदमी पार्टीचे नेते राम पाटील डोरले यांनी 10 एप्रिल पासून परत टेम्पल गार्डन समोर ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी टेम्पल गार्डन सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू अशा इशारा राम पाटील डोरले यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला…
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348