सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम/नागपूर:- एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी एका नराधम पती ने हैवानी कृत्य केलं ही घटना समोर येतात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितनुसार वाशिम येथील एका पतीने हुंड्यासाठी माणुसकीच सोडली व स्वत:च्याच पत्नीची आंघोळ करत असताना क्लिपिंग बनवून तिला ब्लॅकमेल केले. यासंदर्भात नागपुर शहरातील मानकापूर पोलिस स्टेशन येथे पतीसह त्याचा आई- वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 35 वर्षीय विवाहित महिलेचा पती आणि सासरे वाशिम येथे राहतात. महिलेचे पहिले लग्न 2008 मध्ये झाले होते. पती तिच्यावर अत्याचार करायचा. यादरम्यान तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यानंतरही अत्याचारामुळे तिने पतीपासून घटस्फोट घेतला. ती मुलांसोबत आई-वडिलांच्या घरी राहू लागली. यादरम्यान तिची व्यावसायिक तरुणाशी एका ऑनलाइन विवाह संकेतस्थळावर ओळख झाली. नोव्हेंबर 2019 मध्ये तिने तरुणाशी लग्न केले. तिच्या नातेवाईकांनी हुंड्यात चार लाख रुपयांचे दागिने दिले. ती मुलांना आई-वडिलांकडे सोडून तरुणासोबत राहू लागली.
महिला गरोदर राहिल्यानंतर पती आणि तिच्या आई-वडिलांनी 10 लाख रुपयांची मागणी करून तिचा छळ सुरू केला, त्यामुळे तिचा गर्भपात झाला. पुन्हा गरोदर राहिल्यानंतरही तिचा गर्भपात झाला. या छळाला कंटाळून महिला आई-वडिलांकडे गेली. पतीने तिची समजूत घातल्या नंतर तिला परत बोलावले व फ्लॅटमध्ये ठेवले. यानंतरच आंघोळ करताना मोबाईलवरून क्लिपिंग करण्यात आली. 10लाख रूपये न दिल्याने क्लिपिंग व्हायरल करण्याची धमकी दिली. तिचे दागिनेही परत करण्यास नकार दिला. याप्रकरणी महिलेने मानकापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.