पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथे मोठ्या प्रमाणात शिघापत्रिकेवर रेशनिंगच्या स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरू आहे. गरिबाच्या हक्काचे धान्य हे धान्य तस्कर खुल्या बाजारात विकून अमाप पैसा कमवत आहे. अशाच एका धान्याचा काळाबाजारचा खडक पोलिसांनी भडाफोड केला आहे.
खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिघापत्रिकेवर मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर आरोपीवर कारवाई करत खडक पोलिसांनी 2700 किलो तांदूळ जप्त केला आहे. हे धान्य तस्कर शहरातील वेगवेगळय़ा रेशनिंग दुकानदारांकडून राशनिगचे स्वस्त एकत्र करून त्याची काळाबाजार करून वाहतूक केला जात होती. याची माहिती खडक पोलिसांना प्राप्त होताच तेथे छापा टाकून 3 आरोपींना अटक केली. हे आरोपी 2700 किलो तांदूळ बेकायदेशररित्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले
याप्रकरणी जावेद लालू शेख वय 35 वर्ष, अब्बास अब्दुल सरकावस वय 34 वर्ष आणि इम्रान अब्दुल शेख वय 30 वर्ष, सर्व रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई महेश प्रकाश जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींवर जीवनाश्ययक वस्तू कायदा कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी सोसायटी समोर कासेवाडी, भवानी पेठ येथे आरोपी जावेद शेख, इमरान शेख आणि अब्बास सरकावस हे वेगवेगळय़ा रेशनिंग दुकानदारां कडून काळय़ा बाजारात धान्य विकत घेऊन ते केडगाव ता. दौड येथे विक्री करीता घेऊन जात होते. या टेम्पोवर एम एच 12 पी क्मयू 0582 छापा टाकून तीन लाखांच्या टेम्पोसह 40 हजार 500 रुपये किंमतीचा 2700 किलो तांदूळ प्रतिकिलो 15 रुपये प्रमाणे जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एच एम काळे करत आहेत.