मंगेश सावरकर, मध्य नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- स्थानिक इतवारी जय भीम चौक येथील प्रबुधानंद बुद्ध विहार मिरची बाजार येथे 14 एप्रिल 2023 ला महामानव भारतरत्न प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने बुद्ध विहार कमेटी मंगेश सावरकर, करण मुंघाटे, मुकेश गाळवे, रोशन पाटील, वेदांत मानकर, सौरभ फरकिरडे, रौनक ढोके, बापू चामट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्लापन करून व मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले आणि सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या अमूल्य मार्गावर आपण सर्वांनी चालण्याचा संकल्प करावा. सर्वांनी देशात असलेली लोकशाही टिकून राहण्यासाठी समोर येउन कार्य केले पाहिजे. जाती धर्माच्या भिंती तोडून मानव जाती साठी कार्य देशाला समोर घेऊन जाऊन डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न केला पाहिजे असे विचार यावेळी प्रकट करण्यात आले. या कार्यक्रमास प्रबुधानंद बुद्ध विहार परिसरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.