प्रशांत जगताप संपादक 7385445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लेखिका व कवियत्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आयुष्यमती ज्योती किरतकूडवे (साबळे) यांच्या ‘संघर्ष महापुरुषांचा’ या मराठी कविता संग्रह पुस्तकाचे प्रकाशन दादर, चैत्यभूमी येथे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज 14 एप्रिल रोजी भन्ते धम्मप्रिय यांच्या शुभ हस्ते चैत्यभूमीच्या गाभाऱ्यात संपन्न झाले.
या प्रसंगी लेखक आनंद पारगावकर, समाजसेवक सुभाष भवार, त्रिरत्न न्यूस चे संपादक किरण किरतकुडवे, पत्रकार स्वप्नील खरात व आर्यन किरतकुडवे उपस्तिथ होते.
ज्ञानाच्या अथांग महासागर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी झाली पाहिजे, असंही ज्योतीताई यावेळी म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, या उभ्या राष्ट्राला महान बनविण्यासाठी सर्व महापुरुषांनी संघर्ष केला. त्यामुळे आज त्या तम्माम महापुरुषांचा संघर्ष आठवून आपले जीवन सुखमय समृध्द केले पाहिजे. “महापुरुषांचा संघर्ष” हे पुस्तक या सर्व महापुरुषाचे विचार जनमानसात पोहचविण्यासाठी एक महत्वपूर्ण दस्तावेज आहे. त्यामुळे सर्वांनी ते वाचून महापुरुषांचा महान अशा वारसा जपावा.