महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- तालुक्यांतील ओझर बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. व गावातील चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात आले.
या प्रसंगी गावचे पोलीस पाटील सुभाष खेमनर, उपसरपंच संदीप नागरे, ऍडव्होकेट लक्ष्मीकांत खेमनर, ग्रामपंचायत सदस्य गबाजी पाटील, खेमनर तंटामुक्ती अध्यक्ष सचिन खेमनर, एकलव्य मंडळाचे अध्यक्ष ललित मोरे, ग्रामपंचायत सदस्य अजय शेळके, अर्जुन हळनोर, लक्ष्मण खेमनर सर्व अधिकारी व पदाधिकारी गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.